ऑनलाईन गर्भपाताच्या गोळ्यांविरोधात पोलिसांत तक्रार 

ऑनलाईन गर्भपाताच्या गोळ्यांविरोधात पोलिसांत तक्रार 

मुंबई - गर्भपाताची औषधे ऑनलाई सर्रास विकली जात असल्याचे उघडकीस येत असल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उचलला आहे. कामोठे येथील पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

या औषधांच्या ऑनलाईन विक्रीची तक्रार महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशनचे प्रमुख कैलास तांदळे यांनी अन्न व औषध प्रशासनाला केली होती. ही औषधे ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवर उत्तर प्रदेशातील केमिस्टच्या दुकानातून उपलब्ध झाली होती. ऑनलाईन ऑर्डर दिल्यानंतर 29 मे रोजी कामोठे येथील तांदळे यांच्या घरी औषधे पोहोचली होती. गर्भपाताची औषधे प्रसूतीतज्ज्ञांकडून मिळणे बंधनकारक असताना ऑनलाईन विक्री ही गर्भवतींसाठी धोकादायक ठरू शकते, अशी तक्रार तांदळे यांनी केली होती. शिवाय या प्रकराने अवांछित स्त्रीभ्रूण हत्या करण्यासाठी मदत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. ऑनलाईन गर्भपाताची औषधे मिळत असल्याचा अनुभव पुण्यातील एका नागरिकालाही आला होता. वाकड येथील पोलिस ठाण्यात उत्तर प्रदेशातील मित्तल मेडिकल दुकानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ कामोठे येथेही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com