ऑनलाइन डेटिंगमधून ‘सीए’ला लाखोंचा फटका

Crime-Scene
Crime-Scene

मुंबई - डेटिंग संकेतस्थळाला भेट देणे ५४ वर्षांच्या चार्टर्ड अकाउंटंटला (सीए) चांगलेच महाग पडले. वेगवेगळ्या कारणांसाठी त्याच्याकडून तब्बल साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले. याप्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार ‘सीए’चा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला असून, दुसऱ्या पत्नीशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. त्याने एप्रिलमध्ये एका डेटिंग संकेतस्थळाला भेट दिली. तेथे नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मुंबईत एखाद्या बंगाली महिलेशी डेटिंग करायचे असल्याचे त्याने सांगितले. पलीकडून दिलेल्या सूचनेनुसार त्याने आधार कार्डाची सॉफ्ट कॉपी पाठवली. नोंदणीसाठी ८५० रुपये व  संबंधित तरुणीशी बोलण्यासाठी १८ हजार ७०० रुपये त्याने ऑनलाइन पद्धतीने जमा केले. गोपनीयता कराराच्या नावाखाली त्याच्याकडून ५० हजार रुपये घेण्यात आले. सुरक्षा ठेव म्हणून त्याने ६४ हजार रुपये भरले.

पुढे वेगवेगळ्या कारणांसाठी त्याला ४० हजार आणि नंतर ५९ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने पवई पोलिसांकडे तक्रार केली. सर्व व्यवहार रद्द करण्यासाठीही तक्रारदाराला पैसे भरण्याची सूचना करण्यात आली. ही सर्व रक्कम परत मिळणार असल्याचे आश्‍वासनही त्याला देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com