मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरूवात

मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
mumbai
mumbai sakal

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाने यंदाही केवळ प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीच सुरू ठेवल्याने यंदाही महाविद्यालय स्तरावरच विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. (Mumbai News)

पदवीच्या विविध शाखेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज विक्री आणि नोंदणी प्रक्रिया ही 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (1.00 वाजेपर्यंत) चालणार आहे तर ऑनलाईन अर्ज 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत सादर करावा लागणार आहे. (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल. तर या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ही 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजला जाहीर केली जाणार आहे.यासाठी विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, (सायं.3.00वाजे पर्यंत ) करणे आवश्यक आहे द्वितीय गुणवत्ता यादी ही 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजाल जाहीर केली जाणार आहे.त्यासाठी 30 पर्यत कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणे आवश्यक आहे. तर तिसरी गुणवत्ता यादी ही 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर केली जाणार आहे.

mumbai
तालिबान्यांकडून हिंसाचाराचा कहर; अफगाणी माध्यमं 'लॉकडाऊन'

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणी

प्रथमवर्ष बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीएमएम, बी.एस.डब्ल्यू, बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडीज), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए ( पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) , बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडीज), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफ. वाय. बी व्हॉक (इंटेरिअर डिजाईन) एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम) अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.

या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक

5 ऑगस्ट 2021 पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू करण्यात येत आहे. हेल्पलाईन क्रमांक सुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2021-22) या लिंकवर क्लिक करावे. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज कसा करावा, यासाठीची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com