अमोल कोल्हे यांच्या "शिवबंधन' पुस्तकाचे शरद पवारांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रकाशन

संदीप पंडित
Saturday, 24 October 2020

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या व डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या "शिवगंध' या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले

विरार : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या व डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या "शिवगंध' या पुस्तकाचे प्रकाशन आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, सिल्व्हर ओक येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 

अर्णब गोस्वामी पुन्हा गैरहजर! "कारणे दाखवा'साठी पोलिसांत येणे टाळले

यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांचे कौतुक करताना शरद पवार म्हणाले, "नारायणगावामधून येऊन एक दर्जेदार डॉक्‍टर, तितकाच उत्तम अभिनेता आणि आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच वर्षी संसद रत्न पुरस्कार मिळवणारा संसदपटू असणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांची वाटचाल मी जवळून पाहतो आहे. "राजा शिवछत्रपती' या गाजलेल्या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करताना आलेल्या अनुभवांविषयी, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी त्यांनी "शिवगंध' या पुस्तकात रंजकतेने लिहिले आहे.

नागरिकांची दिशाभूल टाळण्यासाठी कोव्हिड जाहिरातींबाबत आचारसंहिता जारी 

डॉ. नितीन आरेकर यांनी त्यांचे अनुभव तशाच रंजकतेने शब्दांकित केले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, लेखक आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुस्तकाचे शब्दांकन डॉ. नितीन आरेकर, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे, कौतुक मुळे, हॉटेल प्रीतमचे संचालक अमरदीपसिंग कोहली, साहित्य जल्लोशचे सचिव संदेश जाधव, प्रतीक ऑफसेटचे प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online publication of Amol Kolhes book Shivbandhan in the presence of Sharad Pawar