मुंबईतील मॅनहोलचा सातबारा, केवळ तीन टक्के मॅनहोल्स सुरक्षित

समीर सुर्वे
Tuesday, 6 October 2020

प्रसिध्द पोटविकार तज्ज्ञ डॉ. दिपक आमरापुरकर यांचा 2017 मध्ये मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला होता

मुंबई : प्रसिध्द पोटविकार तज्ज्ञ डॉ. दिपक आमरापुरकर यांचा 2017 मध्ये मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फक्त 3 टक्के मॅनहोल्सवर आतापर्यंत जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

मुंबईत 95 हजार मॅनहोल्स असून त्यातील 2772 मॅनहोल्सच्या झाकणांखाली लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. अशी माहिती महानगर पालिकेने काही महिन्यांपुर्वी प्रसिध्द केलेल्या एका अहवालात नमुद केली आहे. या प्रत्येक जाळीसाठी महानगर पालिका 10 हजार रुपये खर्च करत आहे.

प्रामुख्याने पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या,  तसेच पाणी साचणाऱ्या भागातील मॅनहोल्सवर पालिकेने जाळ्या बसवल्या आहेत. यात सर्वाधिक जाळ्या शहर विभागात 2008, पश्‍चिम उपनगरात 293 आणि पुर्व उपनगरात 399 मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : डबेवाल्यांच्या लोकलप्रवासासाठी रेल्वेकडून अद्यापही अध्यादेश नाही; क्यूआर कोडची प्रतिक्षा

नाल्याने घेतलेले बळी : 

नाल्यात पडल्याच्या गेल्या सात वर्षात 639 हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यात, 328 हून अधिक नागरीकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक किर्तीचे पोटविकार तज्ज्ञ डॉ.दिपक आमरापुकर यांचाही प्रभादेवी येथील उघड्या मॅनहोल मध्ये पडून 20017 मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडणाऱ्या काही स्थानिक नागरीकांवर पोलिस कारवाई झाली होती.

  • 12 जून 2020 - घाटकोपर पुर्व येथील सावित्रीबाई फुले नगर येथील नाल्यात पडून पाच वर्षिय हुसेन हमीद शेख या मुलाचा मृत्यू.
  • 19 फेब्रुवारी 2020 - अंधेरी पश्‍चिम ओशिवरा येथील नाल्यात पडून 18 वर्षिय कोमल जयराम मंडल या तरुणीचा मृत्यू.
  • 1 जानेवारी 2020 - गोरेगाव एमटीएनएल येथील नाल्यात पडून अरुणकुमार पटेल आणि मनोज गोस्वामी या दोघांचा मृत्यू झाला.
  • 15 जुलै 2019 - धारावी येथे नाल्यात पडून सुमती मुन्ना जैसवार या मुलाचा मृत्यू.
  • 10 जुलै 2019 - गोरेगाव आंबडेकर नगर येथे दिव्यांश धानशी या 2 वर्षाच्या मुलाचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला होता.
  • 25 जुन 2019 - मालाड पश्‍चिम येथील एव्हरशाईन नगर नाल्यात पडून नागेंद्र नागार्जुन या युवकाचा मृत्यू. 

only three percent of manholes are safe read inside story on mumbai manholes

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only three percent of manholes are safe read inside story on mumbai manholes