ओपन एसएससी बोर्ड गुरुवारपासून

Vinod-Tawde
Vinod-Tawde

मुंबई - शारीरिक अक्षमतेमुळे शाळेत जाऊ न शकणारे अपंग विद्यार्थी व कला, क्रीडा क्षेत्रांत पुढील शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी शिक्षण विभाग राज्य मुक्त मंडळ (ओपन एसएससी बोर्ड) स्थापन करणार आहे. या मंडळाचे कामकाज दहा जानेवारीपासून सुरू होणार असून, लिंकही सुरू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेलेल्या आणि शारीरिक अक्षमतेमुळे शाळेत जाऊ न शकणारे अपंग विद्यार्थी, तसेच क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेताना त्याच दिवशी आलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण येते. अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शिक्षण विभागाने ओपन एसएससी बोर्ड स्थापन केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा अथवा कार्यक्रम सांभाळून शिक्षण पूर्ण करता येईल. या मंडळामार्फत डिसेंबर आणि जून महिन्यांत विद्यार्थ्यांना थेट दहावीची परीक्षा देता येईल. या विद्यार्थ्यांची परीक्षा मुक्‍त मंडळातर्फे घेण्यात येईल, असे तावडे यांनी सांगितले.

प्रवेशासाठी पात्रता
वयाची १० वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचवीची परीक्षा देता येईल. त्याचप्रमाणे १३ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची आणि १५ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीची परीक्षा देऊ शकतील. मुक्त शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र आणि राज्य एसएससी बोर्डाचे प्रमाणपत्र समकक्ष असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com