चित्रपट संग्रहालयाचे आज उद्‌घाटन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 जानेवारी 2019

मुंबई - राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कफ परेड येथे उभारलेल्या या संग्रहालयासाठी 104 कोटी 61 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयात भारतीय चित्रपटांचा 100 वर्षांचा इतिहास मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक श्‍याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली हे संग्रहालय बांधण्यात आले. त्यासाठी लेखक आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली "इनोव्हेशन कमिटी' स्थापन करण्यात आली आहे. दोन इमारतींमध्ये हे संग्रहालय साकारण्यात आले आहे.

"द न्यू म्युझियम बिल्डिंग'मध्ये चार विशाल प्रदर्शन दालने आहेत. गांधीजी आणि चित्रपट, बालचित्रपट स्टुडिओ, तंत्रज्ञान, सृजनशीलता आणि भारतीय चित्रपट असे चार विभाग करण्यात आले आहेत. संग्रहालयासाठी लगतच्या गुलशन महल या ऐतिहासिक इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या इमारतीमधील नऊ भागांमध्ये भारतीय चित्रपटाचा उदय, भारतीय मूकपट, बोलपटांचा उदय, स्टुडिओंचा काळ, दुसऱ्या जागतिक युद्धाचे परिणाम आदींची माहिती आहे.

Web Title: The opening of the movie museum today