उल्हासनगर महापालिका सहाय्यक आयुक्तावर लाचलुचपत विभागाची कारवाई 

उल्हासनगर महापालिका सहाय्यक आयुक्तावर लाचलुचपत विभागाची कारवाई 

उल्हासनगर : एका बांधकाम व्यावसायिकाकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारण्या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत (अँटिकरप्शन) विभागाने ही कारवाई केल्याने महापालिका अधिकाऱ्यांचे लाच प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

नंदलाल समतानी हे प्रभाग समिती 1 चे सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांच्या हद्दीत धनवान तलरेजा उर्फ धण्णा हे रिपेरिंगचे अनधिकृतपणे रिपेअरिंगचे काम करत होते. हे बांधकाम तोडायचे नसेल किंबहूना वाचवायचे असेल तर त्याबदल्यात 50 हजार रुपये देण्याची मागणी समतानी यांनी धण्णा याच्याकडे केली होती. 50 वरून 30, 25 आणि शेवटी 20 हजारावर मांडवली झाली. याची तक्रार धण्णा याने अँटिकरप्शन ठाणे यांच्याकडे केल्यावर आज सायंकाळी सुरेश अजगावकर यांच्या टीमने नंदलाल समतानी यांना 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली.

तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या कालावधीत असंख्य महापालिका अधिकारी-कर्मचारी अँटिकरप्शनच्या जाळ्यात अडकले होते. आज ही सर्व मंडळी पुन्हा सेवेत असून ते चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत. समतानी देखील जामिनावर बाहेर येतील आणि काही महिन्यानंतर चांगल्या पोस्टवर कार्यरत होतील असे चित्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com