पदवी प्रमाणपत्रातील चुका दुरुस्त करण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २६ नोव्हेंबरला होईल. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रावरील नावातील चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. मुंबई विद्यापीठामार्फत दर वर्षी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात येतो. पदवी प्रमाणपत्रातील चुका दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

वाढत्या तक्रारी ध्यानात घेऊन मुंबई विद्यापीठाने संकेतस्थळावर एक लिंक दिली आहे. नावात चुका असल्यास त्या दुरुस्तही करता येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर जाऊन ‘कॉन्व्होकेशन करेक्‍शन’ हा पर्याय निवडावा लागेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oportunities to change mistakes in graduation certificate