विरोधकांना पराभवाची जाणीव झाली - घुमटकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मुंबई - माझ्यावर झालेला शाईहल्ला यातून विरोधकांना पराभवाची जाणीव झाली आहे. माझा विजय निश्‍चित असल्याचे मत डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. घुमटकर यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. घुमटकर यांच्या या प्रतिक्रियेवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनीही त्यांच्यावर पलटवार केले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

डॉ. घुमटकर यांच्यावरील शाईहल्ला हा अत्यंत निंदनीय आहे. त्याचप्रमाणे त्यावरील त्यांचे विधानही वादग्रस्त आहे. उर्वरित तिन्ही उमेदवारांची पार्श्‍वभूमी पाहता अशी कृती कोणी करणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. अजूनही निवडणूक सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये लढवली जात आहे त्याला कोणीही गालबोट लावू नये.
- अक्षयकुमार काळे, उमेदवार

खरे तर विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी. वैचारिक मंथन होऊन नवा विचार समाजाला मिळू शकतो. एक साहित्यिक म्हणून घुमटकरांचा विरोधक नव्हे, तर मित्र म्हणून शाई हल्ल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करतो.
- प्रवीण दवणे, उमेदवार

पुरोगामी विचारांवरील हल्ल्याचा निषेध आहेच; मात्र साहित्यिक निवडणूक ही संपूर्णतः राजकीय वळणावर येऊन ठेपली आहे का असा विचार या निमित्ताने पुढे येतो आहे.
- अविनाश कदम, विद्रोही सांस्कृतिक चळवळ

Web Title: Opponents realized until