महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

सुमित बागुल
Saturday, 24 October 2020

स्वतः फडणवीस यांनी ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झालीये. गेले काही दिवस देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत होते. ते सतत गर्दी आणि लोकांमध्ये फिरत होते. गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीसांनी तब्बल ९०० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास केलाय.

पुढे देवेंद्र फडणवीस यांचा बिहार दौरा नियोजित होता. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस तिथं जाणार होते. दरम्यान स्वतः फडणवीस यांनी ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी, असं म्हणत त्यांनी आपल्या झालेल्या कोरोनाबद्दल माहिती दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबईत असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढील औषधोपचार घेत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय.

opposition leader devendra fadanavis detected corona positive and taking treatment as per doctors advice


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leader devendra fadanavis detected corona positive and taking treatment as per doctors advice