संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शनिवार (ता. 15)पासून सुरू होत आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथून प्रारंभ होऊन ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक,पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, 18 एप्रिलला शहापूर येथे या टप्प्याचा समारोप होईल. 

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या वतीने ही यात्रा निघत आहे. भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. 

या यात्रेमध्ये विरोधी पक्षांचे राज्यातील सर्व प्रमुख नेते व आमदार सहभागी होणार आहेत. यात्रेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश असेल. 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विरोधकांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली होती. संपूर्ण विधिमंडळात हंगाम झाल्यावर सरकारने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 19 आमदारांना निलंबित केले होते. त्यानंतर विरोधकांनी राज्यात संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. आता दुसरा टप्पा सुरू होत असून पहिल्या टप्प्यातील उर्वरित विदर्भातील जिल्हे आणि संपूर्ण मराठवाड्यात संघर्ष यात्रा निघेल. संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणा समावेश असणार आहे.

Web Title: Opposition parties pitch for Farmers loan waiver in Maharashtra