विरोधी नेतानिवडीचे राहुल गांधींना अधिकार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 मे 2019

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा नेता निवडीची प्रक्रिया कॉंग्रेसने सुरू केली. आज कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची एकत्रित बैठक घेतली. तीत नवीन नेता निवडीचे सर्वाधिकार कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला.

मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा नेता निवडीची प्रक्रिया कॉंग्रेसने सुरू केली. आज कॉंग्रेसचे राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची एकत्रित बैठक घेतली. तीत नवीन नेता निवडीचे सर्वाधिकार कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा ठराव मांडला व नसिम खान यांनी त्यास अनुमोदन दिले.

खर्गे यांनी प्रत्येक आमदारासोबत स्वतंत्र चर्चा केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; तसेच बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार व वर्षा गायकवाड यांची नावे नवीन विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत. मात्र सामाजिक समीकरणे जुळवण्यासाठी विजय वडेट्टीवार किंवा वर्षा गायकवाड यांना पसंती मिळू शकते, अशी चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition Party Leader Selection Rights Rahul Gandhi Politics