भिवंडीतील अनधिकृत डाईंगवर कारवाईचे आदेश

भिवंडी : डाईंगमधून निघणारे धुराचे लोट
भिवंडी : डाईंगमधून निघणारे धुराचे लोट

भिवंडी : कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग-सायझिंग कंपन्या दिवसरात्र विषारी वायू हवेत सोडत असल्याने भिवंडी शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. नागरिकांची या जीवघेण्या प्रदूषणातून मुक्तता करण्यासाठी येथील नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळ व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्या होत्या. या तक्रारींची दाखल घेत भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी भिवंडीतील शेलार-खोणी परिसरातील 15 अनधिकृत डाईंग-सायझिंगवर कारवाई करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहेत. 

भिवंडी तालुक्‍यातील खोणी व शेलार या ग्रामपंचायत हद्दीत खेमिसती डाईंग प्रोसेसर, शिवकृपा सिंथेटिक, शिवओम इंटरप्रायझेस, जे. जे. फॅब्रिक, जय अंबे प्रोसेसर, सनविन इंडस्ट्री, इनव्हिल कन्सल्टंट व ट्रेडस, श्रद्धा यार्न डाईंग, शत्रुंजय डाईंग, सिलिकॉन सिंथेटिक व कॉटन डाईंग, वालचंद यार्न इंडस्ट्रीज, इसटेस पोलिकोट, संतोष प्रोसेसर, मारूअर रासी मॅन्युफॅक्‍चरिंग, त्रिशूल डाईंग प्रोसेसर अशा एकूण 15 डाईंग व सायझिंग कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. नळदकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

या कारवाईचा तपशील 30 दिवसांत सादर करावा लागणार आहे. दरम्यान, कारवाई निर्देशामुळे अनधिकृत डाईंग-सायझिंग मालकांचे धाबे दणाणले असून राजकीय दबावतंत्र वापरून ही कारवाई थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com