महिन्यातून 48 तास मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

मुंबई : मुलांच्या आयुष्यात वडिलांनाही महत्त्वाचे स्थान असते. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी वडिलांचा सहवासही गरजेचा असतो. त्यामुळे मुलाच्या हितासाठी महिन्यातून किमान दोन दिवस तरी मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याबाबत सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच कायम केला. अल्पवयीन मुले वडिलांचे प्रेम, आपुलकीपासून वंचित राहू नये, या हेतूने हा आदेश देत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. 

शीवमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय घटस्फोटित महिलेने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केले होते. सत्र न्यायालयाने महिन्यातील 48 तास मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचा निकाल दिला होता. त्यास त्या महिलेचा आक्षेप होता. या 40 तासांत माझ्या अल्पवयीन मुलाला त्याचे वडील माझ्याविरोधात भडकवू शकतात, असे त्या महिलेने अपील याचिकेत नमूद केले होते; जन्मदात्या पित्याला मुलापासून वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले. 

नऊ वर्षांच्या संसारानंतर ही महिला डिसेंबर 2017 मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पतीविरोधात तक्रार करत लहान मुलाला घेऊन माहेरी आली होती; मात्र मुलाचा ताबा मिळावा, असा अर्ज पतीने दंडाधिकाऱ्यांकडे केला होता. या अर्जाला त्या महिलेने जोरदार विरोध दर्शवला होता. मुलाला आईची जास्त गरज असते, त्यामुळे मुलाचा पूर्ण वेळ ताबा माझ्याकडेच असायला हवा, असे तिचे म्हणणे होते. सासरच्या घरातील वातावरण चांगले नसल्याने नाईलाजास्तव मला मुलासह घर सोडावे लागल्याचा युक्तिवादही तिने केला होता. 

मुलाला दोघांच्याही सहवासाची गरज! 
मुलाचे त्याच्या वडिलांकडूनच अपहरण होऊ शकते. त्यामुळे वडिलांना मुलाला भेटण्यास मनाई करावी, असे नमूद करणारा अर्ज त्या महिलेने मुलाच्या शाळेतही दिला होता; मात्र हे दावे पतीच्या वकिलांनी अमान्य केले होते. मुलाला आई-वडील दोघांच्याही सहवासाची गरज असते, असा युक्तिवाद संबंधित पित्याने केला होता. उच्च न्यायालयाने तो मान्य करत सत्र न्यायालयाचा आदेश कायम केला. 
 
Web Title: The order to give the child to the father 48 hours a month