मुरबाडमध्येही पंचनाम्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान; अहवाल तात्काळ सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश

सरळगाव : परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार अमोल कदम यांनी दिले आहेत. तालुक्‍यात हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या भातपिकाचे पंचनामे तातडीने करून त्याचा फोटोसह अहवाल तात्काळ कार्यालयात सादर करावा, असे आदेश तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांना काढण्यात आले आहेत.

जर आपल्या शेतावर या पैकी कोणी पंचनाम्यास न आल्यास तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना संपर्क साधून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊन पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहनही तहसीलदार कदम यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order of Panchanama in Murbad

टॅग्स