किनाऱ्यांवरील जीवरक्षकांची चाचणी घेण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मुंबई - राज्यातील सागरीकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तैनात केलेल्या जीवरक्षकांची चाचणी घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई - राज्यातील सागरीकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने तैनात केलेल्या जीवरक्षकांची चाचणी घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबईसह ठाणे आणि कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना हजारो पर्यटक भेट देत असतात. अशा वेळी भरती-ओहोटीमुळे दुर्घटनाही घडतात. त्यामुळे तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था असावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर नुकतीच न्या. अभय ओक व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंबई महापालिकेने मुंबईत आणि राज्य सरकारने किनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे; मात्र काही नियुक्‍त्यांना सुनावणीत हरकत घेण्यात आली. त्यामुळे या जीवरक्षकांच्या पात्रतेसंबंधी व कामासंबंधी चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

अलीकडेच घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर किनाऱ्यांवर पुरेसे अनुभवी व प्रशिक्षित जीवरक्षक असणे गरजेचे आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार आहे.

Web Title: Order to take test of life survivals