
Mumbai News : मुंबईत जमावबंदीचे आदेश; 'या'तारखेपर्यंत निर्बंध लागू
मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ मजारचे पाडकाम करण्यात आले. मात्र आता मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत.
मुंबईमध्ये २५ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. कुठेही जास्त लोकांना थांबता येणार नाही. सुरक्षेच्या संबंधीचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
राज ठाकरेंनी सरकारला दिला होता इशारा
राज ठाकरे काल म्हणाले की, मुंबईच्या समुद्रात अनधिकृतरित्या मजार उभारल्या जात आहेत. माहीम पोलिस स्टेशन जवळ आहे पण त्यांंचं लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक तिथे जातात, परंतु बघितलं जात नाही. समुद्रात नवीन हाजी अली करणार असाल तर याद राखा. प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत कारवाई झाली नाही, ते तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपती मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही.
सगळ्यांकडून दुर्लक्ष करीत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. तुम्हाला सांगतो, हे राज्य माझ्या हातात आलं तर सुतासारखं सरळ करेन, असं म्हणून त्यांनी इशारा दिला होता. अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे.