पालघर - बोर्डी येथे तबला कार्यशाळेचे आयोजन

अच्युत पाटील
शुक्रवार, 25 मे 2018

बोर्डी : मुंबई येथील प्रसिद्ध तबलावादक सिद्धेश कामात सरांच्या 12 व्या तबला कार्यशाळेचे आयोजन बोर्डी येथे जयेश जानी यांच्या मरवड येथील निसर्गरम्य वास्तू मध्ये केले आहे. 

गुरुकुल पद्धती या संकल्पने आधारित या तबला कार्यशाळेची संकल्पना आहे. गुरूवार दिनांक 24 ते रविवार दिनांक 27 पर्यंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळे दरम्यान रियाजवर भर दिला जातो, तसेच वाद विवाद स्पर्धा, संभाषण कला, सांगीतिक कार्यक्रमाचे ही आयोजन केले जात आहे.
रोज 10 ते 12 तास रियाज केला जातो. मोबाईल आणि टीव्ही या 2 पासून लांब राहुन निसर्गाच्या सानिध्यात कलेची आराधना केली जाते, हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे.

शहरी व ग्रामीण भागात बहुतेक कुटुंबात एकच मुल असते, अशावेळी त्यांना शेअरिंग, आजोळ याची अनुभूती नसते. तबला कार्यशाळेच्या निमित्ताने मुलांना या गोष्टीचाही लाभ मिळतो. सुमारे पंचवीस मुले या कर्यशाळेत सहभागी झाले आहेत.

टीम वर्क, शेअरिंग, पंगती जेवण, चांदण्या रात्री अंगणात गप्पा. या सगळ्यामुळे मन ही प्रसन्न राहत. नवं विचार आणि नवं संकल्पाची निमिर्ती ही होते.,

तबला कार्यशाळेच्या निमित्ताने आम्ही पालक ही एकत्र येतो, अनुभवांची देवाण घेवाण करतो. आमचे ही आता एक जिव्हाळ्याचे बेट तयार झाले आहे.
दर वर्षी कला क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून येतात , या कार्यशाळेत शनिवार दिनांक 26 रोजी कथक नृत्यांगना राजेश्री ओक यांच्या मार्गदर्शनाचा मुलांना लाभ मिळणार आहे.

या तबला कार्यशाळेच्या आयोजनात पूर्णिमा नार्वेकर, गौरी कामात, नीता मथुरे, कांचन जाधव, नितीन देसाई, नियती देसाई तसेच जगन्नाथ पै यांचा प्रामुख्याने सहभाग आहे.

या कार्यशाळेमुळे मुलांचा सर्वांगीण विकास ही होतो आणि तबला परीक्षेची तयारी ही केली जाते अशी माहिती कारशाळेच्या संयोजीका
- पूर्णिमा नार्वेकर

Web Title: organised tabla workship in bordi palghar