मारेकऱ्यांना संघटनांचे पाठबळ - मुक्ता दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

ठाणे - डॉक्‍टरांच्या मारेकऱ्यांना अटक झाली असली तरी त्यातील मुख्य सूत्रधारापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत तपास पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. मारेकरी पकडण्यास एवढा वेळ लागला याचा अर्थ त्यांना मोठ्या संघटनांचे पाठबळ असण्याची दाट शक्‍यता आहे. म्हणून मुख्य सूत्रधार सापडणे गरजेचे आहे, असे म्हणणे अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांनी ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडले. त्‍या येथे आयेजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होत्‍या.

तर आणखी हत्या झाल्या नसत्या
डॉक्‍टरांच्या खुनाचा तपास लवकर लागला असता तर पाच वर्षांच्या काळात ज्या तीन हत्या झाल्या त्या झाल्या नसत्या. आणखी काही लोकांच्या जीवाला धोका असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी या कटातील मुख्य सूत्रधाराचा लवकर उलगडा होण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Organizations Support of the killers says Mukta Dabholkar