Mumbai News : मुंबईत सकाळ समुहातर्फे विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यास शिबिराचे आयोजन

सकाळच्या वतीने मुंबईत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यासाठी योगाभ्यासाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे
Organized yoga practice camp for students Sakal Group in Mumbai school student
Organized yoga practice camp for students Sakal Group in Mumbai school student sakal

मुंबई : सकाळच्या वतीने मुंबईत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यासाठी योगाभ्यासाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 10 आणि 11 असे दोन दिवस मुंबईतील विविध शाळांमध्ये हा उपक्रम सकाळतर्फे राबवण्यात येत आहे.

10 फेब्रुवारी रोजी मुंबईतील दादरमधील आयएएस पाटकर गुरुजी विद्यालय या शाळेतील प्राथमिक विद्यार्थ्यांनी योगाभ्यासात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. प्रामुख्याने तिसरी व चौथीच्या 70 विद्यार्थी विद्यार्थीनीनी उपक्रमात भाग घेतला. मीनाक्षी कनागले आणि ज्येष्ठ शिक्षीका शोभना हेगडे यांच्या मार्गदर्शनात उपक्रम पार पडला.

पाटकर गुरुजी विद्यालयासह मुंबईतील शारदाश्रम विद्यालयात सकाळ तर्फे योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. शारदाश्रम शाळेतील 110 विद्यार्थी विद्यार्थिनी उपक्रमांत सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांमधील उत्साह वाखण्याजोगे होतें.

मुख्याध्यापिका दिप्ती इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाने शिबिर पार पडले. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यासाठी आहाराबरोबर व्यायामाची गरज असते. व्यायामामुळे शरीर निरोगी राहते. त्याबरोबर मनाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपले शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असल्याचा संदेश शिबिराद्वारे देण्यात आला.

व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार असा आहे की जो सर्व वयोगटातील व्यक्ती सहजपणे करू शकतात. पूर्ण शरीराला व्यायाम होतो. त्याला वेळही कमी लागतो. अशा या सूर्यनमस्काराचे महत्त्व सकाळ माध्यमाच्या समूहाने ओळखून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन शाळाशाळांतून करण्यात येत आहे.

-दिप्ती किशोर इंदुलकर,मुख्याध्यापिका,शारदाश्रम विद्यामंदिर, मराठी प्राथमिक विभाग.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येईल व आपले भावी आयुष्य हे स्वास्थ ठेवून जगता येईल. सकाळ समुहाद्वारे होणारा हा स्तुत्य उपक्रम आमच्या शाळेत राबवला गेला. विद्यार्थी देखील या उपक्रमांमध्ये आनंदाने व उत्साहाने सहभागी झाले होते. त्याबद्दल सकाळ वृत्तसमूहाचे आम्ही आभारी आहोत.

- शोभना हेगडे , ज्येष्ठ शिक्षीका , पाटकर गुरुजी विद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com