डोंबिवलीत स्वच्छतेसाठी 'जनजागृती दिंडी'चे आयोजन

संजीत वायंगणकर
रविवार, 9 जुलै 2017

कचरामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात नागरिकांच्या साथीने ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला तर त्याची योग्य व शास्त्रीय पध्दतीने पुनर्वापर करण्यासाठी विविध योजना राबाविणे व शून्य डंपिंगग्राऊंडचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल

डोंबिवली : स्वच्छता राखून आपले आरोग्य चांगले राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे, हे समजवून सांगण्यासाठी आगळ्या "जनजागृती दिंडी"चे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी आज (रविवार) आयोजन केले.

कचरामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात नागरिकांच्या साथीने ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला तर त्याची योग्य व शास्त्रीय पध्दतीने पुनर्वापर करण्यासाठी विविध योजना राबाविणे व शून्य डंपिंगग्राऊंडचे उद्दिष्ट साध्य करणे सहज शक्य होईल याकरिता नागरिकांनी जबाबदारीने प्लास्टिक चा वापर पूर्णपणे बांद केल्यास हे शक्य आहे. त्याकरीता “गाव करी ते राव काय करी” या न्यायाने नागरिकांची इच्छाशक्तीच कल्याण डोंबिवलीला कचरामुक्त करू शकते असा विश्वास रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.

या दिंडीत नगरसेविका गुलाब म्हात्रे, परिवहन सभापती संजय पावशे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेऊन प्लॅस्टिक मुक्ती व स्वच्छतेची शपथ घेतली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका दहा लाख कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करुन राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरूवात करणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
संपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा आंदोलनाचा 'एल्गार' !
दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी
भंडारदरा धरणात मुंबईतील तरुण बेपत्ता​
धुळे: टँकरद्वारे पिकांना पाणी; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल​
दिव्यांगाच्या जीवनात शिक्षणाची बहार!​
कॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री बरे होते : आदित्य ठाकरे​
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला धक्का​
'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप​
'लोक'शाही की 'एक'शाही? (संजय मिस्कीन)​
इस्राईलशी मैत्रीपर्व (श्रीराम पवार)​
#स्पर्धापरीक्षा - हरित भारत अभियान​

Web Title: Organizing 'Janjagruti Dindi' for Dombivli cleanliness