कल्याणमध्ये 13मे रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन

रविंद्र खरात
गुरुवार, 10 मे 2018

कल्याण - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या सहयोगाने कल्याण पूर्वेमधील श्रीमलंग रोड वरील आर्य गुरुकूल शाळा नांदीवली येथे 13 मे (रविवार) रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर असणार आहे.

या शिबीरात आरोग्याविषयी विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या विनामुल्य करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार औषधाचेही विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरात ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांची नियोजनानुसार विनामुल्य शास्त्रक्रियाही करण्यात येणार आहे.

ज्या नागरीकांना या शिबीराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत प्राथमिक नोंदणी करावी असे आवाहन या महाआरोग्य शिबीराचे आयोजक प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Organizing a Medical Camp at Kalyan on 13th May