महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादचे आयोजन

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मुंबई - भारतात होणाऱ्या महिलांवरील अत्याचाराला आळा बसावा व जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय परिसंवादच आयोजन मुंबई विद्यापीठात करण्यात आले होते. या परिसंवादाचे उदघाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

लैंगिक समानता आणि याची सामाजिक बाजू या विषयावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्य महिला आयोग आणि मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागानं या राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. केंद्र सरकारने प्रकाशित केलेली लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार, महिलांचा अपहरण व लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार आदींची माहितीची आकडेवारी देखील या कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आली.

बेटी बचाव बेटी पढाव ही योजना केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात राबवत आहे. याबाबत जनजागृती होण गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडक महाविद्याल्याचे प्राचार्य जयमंगल धनराज, मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. संदेश वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ महाविद्यलायला स्वतःची इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुण देण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी मी राज्यसभेत खुश नाही असे विधान करत मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी उपस्थित पत्रकरांच्या अनेक राजीकीय प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organizing a national seminar for woman issues for awareness and creating awareness