ऑस्कर'वीर सनीचा "मातोश्री'वर सन्मान 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई : ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा बालकलाकार सनी पवार बुधवारी (ता. 1) लॉस एन्जेलिसमधून भारतात परतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सनीचे कौतुक केले. 

मुंबई : ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा बालकलाकार सनी पवार बुधवारी (ता. 1) लॉस एन्जेलिसमधून भारतात परतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सनीचे कौतुक केले. 
ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाच्या "लायन' या चित्रपटात मुंबईच्या सनीची मुख्य भूमिका होती. सनी आज पहाटे भारतात परतला. त्यानंतर त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते व सनीचे आजोबा भीमा पवार, वडील दिलीप पवार, आई वसू आदी दुपारी 12.30 वाजता "मातोश्री'वर पोहोचले. उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सनीचे अभिनंदन केले. 

Web Title: oscar nominee movie sunny pawar on 'Matoshree'