रायगडमध्ये 9 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पेण तालुक्‍यातील शेडाशी, पाबळ, जीर्ण या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सहा उमेदवार सरपंचपदासाठी आणि सदस्यपदासाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. दहा केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.

अलिबाग, ता.30 (बातमीदार) : 1 ऑक्‍टोबर ते 13 डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या पेण, कर्जत आणि महाड तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींचे मतदान उद्या (ता.30) होणार आहे. सरपंच व सदस्यपदाच्या 102 जागांसाठी 162 उमेदवार रिंगणात आहेत. 3 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

पेण तालुक्‍यातील शेडाशी, पाबळ, जीर्ण या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सहा उमेदवार सरपंचपदासाठी आणि सदस्यपदासाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. दहा केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
कर्जत तालुक्‍यातील नेरळ, उमरोली, वाकस, जामरुंग, रजपे ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. 11 उमेदवार सरपंचपदासाठी; तर 90 उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात आहेत. 35 केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
महाड तालुक्‍यातील चोचिंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच एक आणि सदस्य 9 अशा एकूण दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी दोन, तर 12 उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात आहेत. तीन केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oting in nine Gram Panchayats today