esakal | 'आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही'; संजय राऊतांचा भाजपला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

'आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही'; संजय राऊतांचा भाजपला टोला

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

'आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही'; संजय राऊतांचा भाजपला टोला

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा स्मृती दिन होय. त्यामुळे त्यांच्या स्मृती स्थळी आज सकाळपासूनच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने अनेकदा शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. याबाबतच पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता. ते म्हटले की, 'शिवसेनेचे हिंदुत्व ज्वलंत आहे. शिवसेना हिंदुत्वाचे राजकारण करीत नाही. कोणत्याही पक्षाने आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. समाजाला गरज असेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन तयार असेल ' असे राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - ठाकरे सरकाची अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच पैशाचीही मदत नाही; प्रवीण दरेकरांची टीका 

'आज बाळासाहेब आपल्यात नाही. परंतु त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत. ते सतत आपल्याला प्रेरणा देत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि मराठी बाणा हा वारसा आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुढे नेऊ! तसेच आजही देशाचे राजकारण बेरोजगारी आणि भूमिपुत्रांच्या मुद्यावर केंद्रीत आहे. जो मुद्दा बाळासाहेबांनी 55 वर्षापुर्वी मांडला होता. त्यांच्यामुळे प्रत्येक राज्यात हा मुद्दा आता राजकीय आणि समाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे'. असेही राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले 

loading image
go to top