राज्यात साथीचे आजार फोफावताहेत!

डेंगीचे सहा हजार रुग्ण; ११ जणांचा मृत्यू; चिकुनगुनियाचाही प्रादुर्भाव
आजार
आजारsakal

मुंबई : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असतानाच राज्यात डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या नऊ महिन्यांत डेंगीचे पाच हजार ९४४ रुग्ण आढळले असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या वर्षी डेंगीचे एकूण तीन हजार ३५६ रुग्ण आढळले होते; मात्र या वर्षीच्या आकडेवारीवरून राज्यातील साथरोग परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसत आहे. डेंगीमुळे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक सहा मृत्यू झाले आहेत तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, नगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला. गेल्या वर्षी डेंगीमुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. डेंगीबरोबरच चिकुनगुनियाचा आजारही फैलावत आहे. सध्या राज्यात चिकुनगुनियाचे एक हजार ४४२ रुग्ण आहेत. गेल्या वर्षी ७८२ रुग्णांची नोंद झाली होती.

आजार
सिद्धूंवरील आरोपावर ‘घराण्या’चे मौन कसे?

दूषित पाण्याचा फटका

कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळसारखे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. या आजारांचे आतापर्यंत १,२१७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी एक हजार १७४ रुग्णांना बाधा झाली होती. २०१८ मध्ये २२८९; तर २०१९ मध्ये १,५१० रुग्णांची नोंद झाली होती.

मलेरियाचे नऊ हजार २८९ रुग्ण

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात मलेरियाचा प्रादुर्भाव यंदा नियंत्रणात आहे. राज्यात मलेरियाचे आतापर्यंत नऊ हजार २८९ रुग्ण आढळले आहेत; तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मलेरियाचे १२ हजार ९०९ रुग्ण; तर १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

आजार
रशियात गोळीबारात ८ ठार

साथरोगाची रुग्णसंख्या

  • डेंगी : ५,९४४

  • चिकुनगुनिया : १,४४२

  • मलेरिया : ९,२८९

  • दूषित पाण्यामुळे : १,२१७

डेंगीचा प्रभाव असलेले जिल्हे

नागपूर, वर्धा, पुणे, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, अमरावती, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com