बाहेरील पदार्थांना मज्जाव नाहीच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मज्जाव करता येणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असली, तरी तूर्त या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. या संदर्भात चित्रपटगृह असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहण्याचे ठरवले आहे. मात्र, असोसिएशनचे अध्यक्ष दीपक अशर यांनी हे प्रकरण न्यायालयात असल्याने प्रतिक्रिया दिली नाही. 

मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मज्जाव करणारा कोणताही कायदा नाही किंवा यासाठी राज्य सरकारने कधीच अटकाव केला नव्हता, अशी बाजू सरकारने आता उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे, तसेच बंद पाकिटातील पदार्थांबरोबर कॉफी, पॉपकॉर्नसारख्या सुट्या पदार्थांची किंमतही नियमित करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: outside food are not allowed