अमृता फडणवीसांची पाऊले थिरकली स्टेजवर (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 डिसेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा नृत्य सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी एका घरगुती लग्न समारंभात बाजीराव-मस्तानी चित्रपटातील 'मै दिवानी-मै मस्तानी' हो गयी, या गाण्यावर नृत्य केले आहे. सध्या अमृता फडणवीस यांच्या या नृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

अमृता यांनी आपल्या फेसबुक आणि इंस्ट्राग्राम अकाऊँटवरुन नृत्य करतानाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये एका घरगुती कार्यक्रमातील आनंदाच क्षण असेही त्यांनी लिहिले आहे. बाजीराव-मस्तानी चित्रपटातील मै मस्तानी हो गई... या गाण्यावर अमृता यांनी दीपिका पदुकोणच्या स्टाईलने हुबेहुब डान्स केला आहे. अमृता यांच्या या नृत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.

अमृता फडणवीस या नेहमीच कुठल्यातरी कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी, बिग बी अमिताभ यांच्यासोबत गायलेलं गाण, तर कधी मुंबई-गोवा बोट उद्घाटनावेळी काढलेला सेल्फी अमृता यांच्या चर्चेचाल विषय बनला होता. अर्थातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सातत्याने अमृता यांची पाठराखण करत असताना आपण पाहिलेले आहे. आता या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्याविषयीच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले आहे.

Web Title: Outstanding Performance Amrita Fadnavis' Dance on barjirao mastani song