esakal | 'अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला'

बोलून बातमी शोधा

उद्ध ठाकरे
'अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला'
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार राजकारणही सुरु आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. वणवण भटकावे लागतेय.

हेही वाचा: Lockdown 2.0: मुंबई लोकल सेवाही बंद होणार?

दरम्यान रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणात राज्य सरकारने अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली केली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे ही बदली करण्यात आलीय. अभिमन्यू यांच्या जागी परिमल सिंग यांच्याकडे fda आयुक्त पदाची सुत्रे देण्यात आली आहेत.

दरम्यान अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "रेमदेसीवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारने सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत" असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे.