कोरोनावर मात करत अर्थव्यवस्थेस लवकरच रुळावर आणू - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 5 April 2020

कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्थेस रुळावर आणणे ही सध्या राज्यासमोरची प्रमुख दोन आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरात थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला

मुंबई : कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्थेस रुळावर आणणे ही सध्या राज्यासमोरची प्रमुख दोन आव्हाने आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरात थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतांना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडे सहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणे, दररोज वाढणारे मृत्यू रोखणे, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणे, टाळाबंदीने ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हाने आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरातस न आणणे, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणे हे तुमचे कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणे टाळले तर, कोरोना नक्कीच आटोक्‍यात येऊ शकेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

 अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

नागरिकांनी सहकार्य करावे 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्‍यात दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत असताना राज्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्तावर उतरुन गर्दी करणे टाळावे. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेने काम करत असून, नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
Overcoming Corona, we will bring economy back on track - Ajit Pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming Corona, we will bring economy back on track - Ajit Pawar