esakal | सायन-पनवेल महामार्गावर ओव्हरलोड ट्रकची सर्रास वाहतूक; आरटीओचे भरारी पथकाचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

सायन-पनवेल महामार्गावर ओव्हरलोड ट्रकची सर्रास वाहतूक; आरटीओचे भरारी पथकाचे दुर्लक्ष

पोलिस चौकीवर वाहतूक पोलिसांना यासंदर्भात कारवाई का होत नसल्याची विचारणा असता आम्हाला ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सायन-पनवेल महामार्गावर ओव्हरलोड ट्रकची सर्रास वाहतूक; आरटीओचे भरारी पथकाचे दुर्लक्ष

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर दिवसभर ओव्हरलोड ट्रकची सर्रास वाहतूक सुरू आहे. इमारत बांधकामासाठी लागणारी रेती, गिट्टीसह इतर मालाची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. धक्कादायक म्हणजे वाशी टोलनाक्यानंतर सायन-पनवेल महामार्गावर पोलीस चौकी आहे. मात्र, या ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे चौकीतील वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

हजारो मशालींनी उजळून निघाला किल्ले प्रतापगड! भवानी मातेच्या मंदिराला 360 वर्षे पूर्ण

लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी लोकल बंद आहे. त्यामुळे रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूकीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या भीतीने  दुचाकी, खासगी चारचाकीने इतर प्रवासी वाहतूकीचा पर्याय नागरिकांनी निवडला आहे. मात्र, या परिस्थितीत सायन - पनवेल महामार्गावर दिवसभर वाहतूकीची कोंडी होत असून ट्रक, डम्पर चालकांकडून सर्रास ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. 

सी.डी.देशमुखांच्या गावाची ऊर्जा कार्यक्षम मोहिमेत निवड! कोकण विभागातील एकमेव गाव

यादरम्यान पनवेल, वाशी, वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाची हद्द सुद्धा लागते, मात्र ओव्हरलोड ट्रक, डम्परवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळच्या प्रतिनिधीने महामार्गावरील पोलिस चौकीवर वाहतूक पोलिसांना यासंदर्भात कारवाई का होत नसल्याची विचारणा असता आम्हाला ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत फसवणूक; भाजपची राज्यपालांकडे तक्रार​

आरटीओची भरारी पथके गायब
ओव्हरलोड वाहतूक, त्या वाहनांचे कागदपत्र तपासण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकांना आहे. त्यासाठीच भरारी पथकाची निर्मिती केली आहे. मात्र, अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या ओव्हरलोड ट्रक, डम्पर मालवाहतूकीवर आरटीओच्या भरारी पथकांकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून आणि भरारी पथकांकडून नियमित कारवाई केली जाते. मात्र, यादरम्यान काही दुर्लक्ष झाले असल्यास आरटीओच्या भरारी पथकांना नियमित कारवाईचे आदेश देण्यात येणार आहे.
- अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग

----
संपादन ः ऋषिराज तायडे