esakal | कर्तव्यदक्ष : मालकाने दया न दाखवता हकालपट्टी केली परंतु पोलिसांनी मजूरांना न्याय मिळवून दिला
sakal

बोलून बातमी शोधा

police

लॉकडाऊनमुळे परराज्यातून आलेले मजूर कामगार मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. मात्र, माणगाव शहरामध्ये अशाच एका स्वीटमार्टमध्ये दोन वर्षांपासून काम करणाऱ्या चार तरुणांची दुकान मालकाने हकालपट्टी केली.

कर्तव्यदक्ष : मालकाने दया न दाखवता हकालपट्टी केली परंतु पोलिसांनी मजूरांना न्याय मिळवून दिला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माणगाव : लॉकडाऊनमुळे परराज्यातून आलेले मजूर कामगार मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. मात्र, माणगाव शहरामध्ये अशाच एका स्वीटमार्टमध्ये दोन वर्षांपासून काम करणाऱ्या चार तरुणांची दुकान मालकाने हकालपट्टी केली. कर्तव्यदक्ष पोलिसांनी याप्रकरणी दुकान मालकाला समज देत कामगारांना न्याय दिला.

हे ही वाचा : 'का' वाढतोय कोरोना रुग्णांचा आकडा? मुंबई पालिकेनं घेतला शोध... 

दोन वर्षांपासून राजस्थान येथील चार तरुण काम करत होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि स्वीटमार्ट दुकान चालत नसल्याने या दुकान मालकाने रामलाल राणा, मागीलाला राणा, मुकेश राणा, सीताराम राणा, तसेच त्यांच्या पत्नी दुर्गा राणा, डाळी राणा व दोन लहान मुले अरुण (वय 3) आणि वरूण हा 7 महिन्यांचा मुलगा या सर्वांची दया मया न दाखवता रविवारी (ता. 3) हकालपट्टी केली. हे मजूर सकाळी 8 वाजता माणगाव ते वावेदिवाळी-मुंबई-गोवा महामार्ग असा प्रवास केला. दुपारच्या वेळी ते आपल्या लहान मुलांना घेऊन झाडाखाली बसले होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना पाणी प्यायला मिळेल का? अशी विचारणा करत होते. ही माहिती स्थानिक पत्रकाराने त्वरित माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांना दिली. 

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

इंदापूर पोलिस ठाण्याचे विभागीय अंमलदार चव्हाण यांनी काही मिनिटांत माणगावमधील त्या स्वीटमार्ट मालकाशी संपर्क साधत त्याला बोलावून घेतले. त्यावेळी त्याने हे मजूर माझेच आहेत, असे मान्य करून कामगारांना त्यांच्या मूळ गावी राजस्थानला सोडण्याची जबाबदारी घेतली, असे पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी सांगितले.

 Dutiful: owner fired but the police gave justice to the workers