पैसे न दिल्याने मालकाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

कोपरखैरणे - गावाकडे जाण्यास पैसे देत नाही म्हणून कामगाराने मालकाची हत्या केल्याचा प्रकार बोनकोडे येथे घडला आहे. यातील आरोपी फरारी झाला असून, पोलिस शोध घेत आहेत. 

कोपरखैरणे - गावाकडे जाण्यास पैसे देत नाही म्हणून कामगाराने मालकाची हत्या केल्याचा प्रकार बोनकोडे येथे घडला आहे. यातील आरोपी फरारी झाला असून, पोलिस शोध घेत आहेत. 

बोनकोडे येथे ओम साई हे जुन्या फर्निचरच्या विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. केवळ 10 दिवसांपूर्वी या ठिकाणी अहेतेशामुद्दीन हुसेन (वय 28) याने काम सुरू केले होते. मालक शर्मा व हुसेन दोघेही दुकानातच राहत होते. त्याला गावी जाण्यासाठी आगाऊ रक्कम हवी होती; मात्र मालक रामहित शर्मा यांनी त्याला आगाऊ रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने शर्मा यांच्या डोक्‍यात तेथेच ठेवलेल्या एका लाकडाच्या दांडक्‍याने प्रहार केला. त्यातच शर्मा यांचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला. ही घटना रात्री घडली. सकाळी 8 वाजता उघडणारे दुकान 10 वाजले तरी उघडले नाही आणि दुकानाच्या काही फळ्या उघड्या दिसल्याने अन्य कामगारांनी आत प्रवेश केल्यावर ही घटना समोर आल्याचे कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. 

Web Title: Owner's murder

टॅग्स