मुरबाड तालुक्यात 75 टक्के भात पिकाची लावणी पूर्ण

मुरलीधर दळवी
बुधवार, 18 जुलै 2018

मुरबाड (ठाणे) : भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे पावसाळी भात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत..

पारंपरिक बियाणे तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. तालुक्यात 15,970 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. त्यापैकी 75 टक्के भात पिकाची लावणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण कांबळे यांनी दिली.

मुरबाडी झिणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व अत्यंत चविष्ट असलेल्या झिणी या बारीक तांदुळाची दिवसेंदिवस लागवड कमी होत आहे. मुरबाड तालुक्यात फक्त नारीवली बांधिवली धसई परिसरात या जातीची लागवड केली आहे. या पारंपरिक बियाण्याऐवजी दप्तर या सुधारित भात बियाण्याची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. तसेच पोह्यासाठी वापरले जाणारे बोडका, भाकरी साठी वापरला जाणारा महाडी, जाडा, तोरण्या या पारंपरिक भात बियाण्याचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत आहे.

पावसाळ्यामध्ये भाजीपाला चवळी, उडीद, तूर अशी कडधान्य पीकही घेतले जाते; परंतु त्याचे प्रमाण कमी आहे.

Web Title: Paddy plantation in Murbad in full swing