पादचारी जिना कोसळला अन् एमएमआरडीए आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश...

bridge
bridge

मुंबई : गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सरकारी यंत्रणांनी केलेल्या विकासकामांचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. मालाड पूर्व भागात पश्चिम द्रुतगती महामार्गला जोडून असलेला पादचारी जिना शनिवारी कोसळला. हा जीना म्हाडाने बांधला होता. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ढिगाऱ्याकडे काही दुचाकी दबल्या होत्या. 

या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सर्व अभियंत्यांना महामार्गावरील पादचारी पुलांचे आणि तत्सम संरचनांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
एसटी महामंडळात तब्बल 'इतक्या' कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; एसटीच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..

पूर्व व पश्चिम या दोन्ही द्रुतगती मार्गांच्या दुतर्फा अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्प व उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी बांधकामांच्या दुरुस्त्या, डागडुजी व नवी बांधकामे करावी लागतात. मेट्रो व उड्डाणपूल एमएमआरडीए करत असल्याने या मार्गांवरील विविध कामांच्या परवानग्या मिळवणे सोपे होण्यासाठी हे दोन्ही मार्ग एमएमआरडीएकडे तात्पुरते हस्तांतरित करण्यात आले आहे. 

मालाड पूर्व भागात पुष्पा पार्क जंक्शनजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गला जोडून असणार जिना शनिवारी रात्री कोसळला. हा जिना म्हाडाने 2011 मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गला जोडून उभारण्यात आला असल्याने या महामार्गाची डागडुगीचे काम आता एमएमआरडीएने करणार आहे. यासाठी एमएमआरडीए आयुक्तांनी सर्व अभियंत्यांना महामार्गावरील पादचारी पुलांचे आणि तत्सम संरचनांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यावेळी महामार्गावरील बाह्य  भागाचे कामे एमएमआरडीए करणार नाही असे ही एमएमआरडीएने स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com