विद्यार्थिनींकरिता पॅडमॅन चित्रपटाचा विशेष 'शो' 

अच्युत पाटील 
गुरुवार, 29 मार्च 2018

बोर्डी - अस्मिता योजनेच्या शुभारंभाच्या औचित्यावर शासनाकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील आठवी ते दहावी इयत्तेच्या विद्यार्थिनींना विनामुल्य पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट तालुक्यातील सुमारे चौदाशे विद्यार्थिनींना आतापर्यंत दाखविण्यात आला असून, चित्रपट बघितल्यानंतर आरोग्य विषयक सल्ला मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थिनी तसेच शिक्षिकांनी व्यक्त केली. 

राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला आणि जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणार्‍या अस्मिता योजनेचा शुभारंभ नुकताच केला. त्या अनुषंगाने मासिकपाळी व्यवस्थापन तसेच नॅपकिन्सच्या वापरासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने पॅडमॅन हा चित्रपट दाखविल्यास उपयुक्त होईल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे हा चित्रपट विनामूल्य दाखविण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी येथील पौर्णिमा टॉकीजची निवड केली आहे. 

मंगळवार, 27 मार्च रोजी पहिल्या दिवशी 11 ते 2 या वेळेत 351 आणि 2:30 ते 5 या कलावधीत 308 विद्यार्थिनींना चित्रपट दाखविण्यात आला. तर बुधवारची दोन सत्र मिळून दोन दिवसात चौदाशे विद्यार्थिनींनी हा चित्रपट पहिला आहे. तर नरपड येथील अ. ज. म्हात्रे या माध्यमिक विद्यालयाने तिकीट काढून हा चित्रपट विद्यार्थिनींना दाखविला आहे. 

दरम्यान, पालघर या आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिंनिंसाठी विनामूल्य हा चित्रपट दाखविणे आवश्यक असल्याची मागणी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांकडून केली जात आहे. 

''जिल्हास्तरीय आदेशानुसार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 8 वी ते 10 वी इयत्तेच्या विद्यार्थिनींना विनामूल्य चित्रपट दाखविण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत चौदाशे विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला आहे''. 
विष्णु रावते(प्रभारी गटशिक्षणाधिकारी, डहाणू पंचायत समिती)

''या चित्रपटातून आरोग्यविषयक खूप शिकण्यासारखे असून त्याचा फायदा असंख्य विद्यार्थिनींना होणार आहे''. 
भूमिका दिलीप राऊत(विद्यार्थिनी, अ. ज. म्हात्रे माध्यमिक विद्यालय)

Web Title: padman's special screening for students