esakal | ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लीलावती रुग्णालयात... 
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लीलावती रुग्णालयात... 

नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लीलावती रुग्णालयात... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी त्यांना वांद्रे पश्‍चिम येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. आप्पासाहेब धर्माधिकारी हे श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख असून अलिबाग तालुक्‍यातील रेवदंडा या ठिकाणी वास्तव्यास आहेत. 

मोठी बातमी - संजय राऊत यांचं 'चक्रावून' टाकणारं ट्विट, राऊत म्हणतात...

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. आप्पासाहेब हे पुढील फोन दिवस रुग्णालयातच राहणार असून यादरम्यान त्यांच्या नियमित चाचण्या करण्यात येणार आहेत. चाचण्या झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. 

मोठी बातमी - कोरोनाशी लढण्यास 'असा' सज्ज झालाय महाराष्ट्र...

आप्पासाहेब धर्माधिकारी रायगड जिल्ह्यात समाजजोद्धाराचे काम करत असून ज्येष्ठ निरुपणकार म्हणून ओळखले जातात.राज्यभरात लाखोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी असून रेवदंडा या त्यांच्या कर्मभूमीत नेहमीच गर्दी असते. आपल्या नियमित तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुंबईतील रुग्णालयात का दाखल करण्यात आले याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. 

मोठी बातमी - मोबाईल फोन आणि नोटांमुळे पसरतो कोरोना, जाणून घ्या शास्त्रीय कारण...
 

Padmashree Appasaheb Dharmadhikari admitted in mumbais lilavati hospital