वारली चित्रकार जिवा म्हसे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

डहाणू - प्रसिद्ध आदिवासी वारली चित्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित जिवा सोमा म्हसे (वय ८४) यांचे त्यांच्या डहाणू येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पालकमंत्री विष्णू सवरा उपस्थित होते. 

तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. वारली चित्रकला दालन आणि चित्रकला प्रसार करण्यासाठी गंजाड येथे सरकारने त्यांना ५८ गुंठे जागा दिली होती. त्यांनी आखाती देशात वारली चित्रकला पोचवली होती.  एक महिन्यापूर्वी घरात पडल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. 

वृद्धापकाळात सरकारकडून उपेक्षा
वारली चित्रकार म्हणून वारली चित्रकार जिवा म्हसे यांना मिळणाऱ्या मानधनावर त्यांचे कुटुंब गुजराण करीत होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना मिळणारे मानधन बंद झाले. त्यानंतर त्यांनी मानधन मिळण्यासाठी अर्ज केले; मात्र त्यांना मागील तीन वर्षांपासून मानधनापासून वंचित जीवन जगावे लागले. वृद्धापकाळात त्यांच्या पदरी उपेक्षाच पडल्याची प्रतिक्रिया त्यांचा मुलगा सदाशिव म्हसे यांनी दिली.

Web Title: painter jiva mhaske death