पाकिस्तानसाठीचा निधी अमेरिकेने रोखला...

रॉयटर्स
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

वॉशिंग्टन - दहशतवादाविरोधात पाकिस्तानकडून समाधानकारक कारवाई करण्यात येत नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अमेरिकेकडून पाकिस्तानच्या सैन्यास दिला जाणारा "मदतनिधी‘ रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांसारख्या दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानकडून पुरेशी कारवाई करण्यात येत नसल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानसाठी प्रस्तावित असणारा 30 कोटी डॉलर्सचा निधी रोखून धरण्याचा निर्णय अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. 

दहशतवादाविरोधात कारवाई करणाऱ्या अमेरिकेच्या साथीदार देशांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या "कोऍलिशन सपोर्ट फंड‘च्या माध्यमामधून हा निधी देण्यात येतो. पाकिस्तान हा या व्यवस्थेमधून सर्वाधिक निधी मिळणारा देश आहे. पेंटॅगॉनने दिलेल्या माहितीनुसार, या व्यवस्थेंतर्गत 2002 पासून पाकिस्तानला याआधीच तब्बल 14 अब्ज डॉलर्सचा निधी पुरविण्यात आला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. याचबरोबर, दहशतवादाविरोधातील या युद्धासंदर्भात पाकिस्तानला "काही मर्यादा‘ असल्याचीही भूमिका पाककडून घेण्यात आली आहे. 

पाकिस्तानला मदत देण्यास अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहामध्ये वाढता विरोध होत असून पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम, दहशतवादासंदर्भातील धोरण आणि अफगाणिस्तानमधील पाकच्या संदिग्ध भूमिकेबद्दल अमेरिकेमधील अनेक नेत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

Web Title: Pakistan