कारवाया थांबल्यावरच पाकच्या कलाकारांचे स्वागत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला वैयक्तिक विरोध नाही; पण पाकिस्तानकडून भारतावर सतत होणारे भ्याड हल्ले आणि त्यात जवानांचे जाणारे बळी आता अजिबात सहन केले जाणार नाहीत. पाकिस्तानने भारतातील कारवाया थांबवल्यानंतरच आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत करू. मात्र, तोपर्यंत विरोध कायम राहील, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे व सरचिटणीस शशांक नागवेकर उपस्थित होते. 

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत भारताबाहेर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अभिनेता फवाद खानसह पाकिस्तानी कलाकार निघून गेल्याचे समजते. त्याबाबत खोपकर म्हणाले, की आमच्या इशाऱ्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकार 48 तासांत भारताबाहेर गेले आहेत. मनसेच्या इतर आंदोलनाप्रमाणेच हेसुद्धा यशस्वी झाले. 

कोणताही पाकिस्तानी खेळाडू, गायक किंवा सामन्याच्या समालोचकालाही भारतात काम करता येणार नाही. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या "ऐ दिल है मुश्‍किल‘ चित्रपटाला विरोध कायम असून, हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला.

Web Title: Pakistan welcomed the activities of artists