पाकिस्तानी कलाकारांना नामांकन दिल्याने निषेध

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 जानेवारी 2017

चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दाखवले काळे झेंडे
मुंबई - एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानी कलाकारांना नामांकन दिल्यामुळे काही संघटनांनी काळे झेंडे दाखवून याचा निषेध व्यक्त केला. पाकिस्तानविरोधी घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

वरळीतील नॅशनल स्पोर्टस्‌ क्‍लब ऑफ इंडियामध्ये शनिवारी सायंकाळी हा चित्रपट पुरस्कार सोहळा होता. आयोजकांना यापूर्वीच सूचना देऊनही त्यांनी पाकिस्तानी कलाकारांचे नामांकन रद्द केले नाही. त्यामुळे सायंकाळी हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी अन्य संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते अरविंद पानसरे म्हणाले, की या पुरस्कार सोहळ्यासाठी पाकिस्तानी कलाकारांची निवड करून देशवासीयांच्या भावनेवर मीठ चोळण्यात आले आहे.

देशाच्या सीमेवर आपले जवान हौतात्म्य पत्करत असताना येथील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना पाकिस्तानचा पुळका आला आहे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. केवळ चित्रपटांत देशप्रेम दाखवू नका. पाकिस्तानी कलाकारांना बहिष्कृत करून आपले देशप्रेम दाखवा. या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल आणि सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Pakistani artists protest after enrollment