काही मिनिटांत नजरेसमोर होत्याचे नव्हते झाले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

भायखळा - भायखळ्यातील पालनजी रतनजी चाळीत बुधवारी (ता. ९) लागलेल्या आगीत १० खोल्या खाक झाल्या. नारायण कोंडाळकर, विवेक राणे, प्रशांत तुळस्कर, अविनाश सावंत, सूर्यकांत शिरवडकर आदी रहिवाशांसह अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने त्यांच्यापुढे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  आम्ही जगायचे कसे, असा सवाल ते करीत आहेत.

नारायण कोंडाळकर यांच्या घरातील जवळपास सर्वच वस्तू खाक झाल्या आहेत. त्यांनी ३३ वर्षे शेतीचे काम करून संसार मांडला होता. परवा शेतीसाठी गावी गेले असता, काल रात्री त्यांना फोन गेला आणि गावाहून मुंबईकडे परतल्यावर डोळ्यांसमोर अंधार दिसला. विवेक राणे यांच्या घरातील सर्वच वस्तू आगीत खाक झाल्या. घरातील २५ हजारांची रक्कमही जळून गेली. सेवानिवृत्तीची रक्कम व मुलांच्या पैशातून उभ्या केलेल्या संसारावर नियतीने घाला घातला.

पुन्हा इतका संसार उभा करणेही अशक्‍य असल्याचे त्यांनी सांगितले. बॅंकेत कामाला असलेल्या प्रशांत तुळस्कर यांच्याही घरातील सर्व वस्तूंसह सर्व कागदपत्रेही खाक झाली. त्यांची मुलगी हॉटेल मॅनेजमेंटसाठी आवश्‍यक जर्मन भाषा शिकतेय. तिची सर्व पुस्तके तसेच घरातील सर्व मोबाईलही नष्ट झाले.

खासगी कंपनीतील अविनाश सावंत यांच्या घरातील सर्व वस्तूंसह पैसेही खाक झाले. हातावर पोट असलेल्या कुटुंबाला महिना भागविणेही अवघड झाले आहे. खासगी कंपनीत शिपाई असलेल्या सूर्यकांत शिरवडकर यांच्या घरातील कपडेही खाक झाले.

जेवणाची आणि निवासाची व्यवस्था
नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी काल लुणावा भवन, म्युनिसिपल शाळा आणि स्थानिक वेल्फेअर सेंटरमध्ये रहिवाशांची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांची आरोग्य तपासणी केली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची जेवण व पाण्याची व्यवस्था केली.

Web Title: palanaji ratanaji Chawl Fire loss