बहुजन विकास आघाडीकडे हुकमाचे पत्ते

Palghar
Palghar

पालघर लोकसभेचा गड जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युतीतच सध्या जुंपलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने हा मतदारसंघ भाजपच्या हातून हिसकावण्यासाठी वेगळी खेळी चालवली आहे. जुना मित्रपक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला (बविआ) सोबत घेऊन त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादी करीत आहे. शिवसेनेसोबतचा संघर्ष आणि ‘बविआ’ला काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ भाजपसाठी डोकेदुखी ठरेल.

पालघर मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. पहिल्याच निवडणुकीत ‘बविआ’चे बळीराम जाधव निवडून आले; मात्र २०१४ मध्ये ‘मोदी लाटे’मुळे भाजपचे चिंतामण वनगा जिंकून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघरमधील सहांपैकी तीन जागा जिंकून आपले वर्चस्व ‘बविआ’ने दाखवून दिले. वसई-विरार महापालिकेतही ‘बविआ’ने भाजपला धूळ चारली होती. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपने काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना रिंगणात उतरवत वर्चस्व राखण्यात यश मिळवले.  

‘बविआ’ची साथ मिळवण्यासाठी सर्वच पक्ष इच्छुक आहेत; मात्र ‘बविआ’चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. या मतदारसंघात माकपचीही डहाणू, तलासरी आणि इतर भागांत बऱ्यापैकी ताकद आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधूनमधून बदलत आहेत. असे असले तरी २०१४ प्रमाणेच वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष दिसण्याची चिन्हे आहेत. 

मतदारही काही बाबतीत नाराज आहेत. लोकल सेवेचा प्रश्‍न, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा, डहाणू-नाशिक रेल्वेचा रखडलेला प्रश्‍न, कारखान्यांची बिकट परिस्थिती, मच्छीमारांची उपासमार, आदिवासींच्या विकासाची घोषणा कागदावरच यावरही पक्षांना उत्तर शोधावे लागणार आहे.

२०१४ चे मतविभाजन 
    भाजप - चिंतामण वनगा ५,३३,२०१ (विजयी)
    बविआ - बळीराम जाधव २,९३,६८१
    सीपीएम - रूपा खरपडे ७८,८९०
    आप - पांडुरंग पारधी १६,१८२

इच्छुक उमेदवार
    भाजप - राजेंद्र गावित
    शिवसेना - श्रीनिवास वनगा
    काँग्रेस - दामू शिंगडा, सचिन शिंगडा
    बविआ - बळीराम जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com