जव्हारमध्ये ड्रोनद्वारे कोरोना लसवाहतूक; ३०० डोसची केली डिलीव्हरी

देशातील पहिलाच प्रयोग असल्याचा आरोग्य विभागाचा दावा
corona vaccines in drone
corona vaccines in dronesakal media

मोखाडा : पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम आणि डोंगराळ तालुक्यांत अजूनही वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजलेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या भागात कोरोना लसीचे डोसही (corona vaccines) पोहोचवण्यास अनेक अडचणी येत आहेत. यावर तोडगा काढत राज्याच्या आरोग्य विभागामार्फत (Maharashtra health department) जव्हारमध्ये ड्रोनमार्फत लस पोहोचवण्याचा (vaccines reached through drone) प्रयोग गुरुवारी करण्यात आला. देशातील पहिलाच असणारा हा लसीकरण प्रयोग यशस्वी ठरला आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

corona vaccines in drone
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २७९ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कामे जलद आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडासारख्या भागांत कोरोना लसीचे डोस पोहोचवण्यास विलंब आणि अनेक समस्या उद्‍भवत होत्या. जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत लस पोहोचवण्याची संकल्पना राबवण्यात आली. यानुसार समस्यांवर मात करण्यासाठी ड्रोनद्वारे लसीकरण मोहीम राबवण्यासाठी जव्हारमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. याचे प्रात्यक्षिक ब्ल्यू इन्फिनिटी आणि आयआयएफएल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून आज (ता. १६) जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम येथे करण्यात आले.

येथून १८ कि.मी. अंतरावर असणाऱ्या झाप प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीचे ३०० डोस केवळ नऊ मिनिटांत पोहोचवण्यात आले. या ड्रोनची क्षमता पाच किलो वजन २५ कि.मी.पर्यंत वाहून नेण्याची असल्याचे सांगण्यात आले. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला गती मिळणार आहे असे सांगण्यात आले. जव्हार ते झापपर्यंत जाण्यासाठी गाडीला साधारणत: एक तास लागतो; मात्र कमी दुर्गम भाग असल्याने वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.

corona vaccines in drone
तुळशीच्या 3 लाख मण्यांतून साकारली 'श्री दत्त देवाची' प्रतिमा; तिसरा विश्वविक्रम

झाप आरोग्य केंद्रामध्ये या डोसचे उद्यापासून (ता. १७) लसीकरण करण्यात येणार आहे. जव्हार येथे प्रात्यक्षिक वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामस्वामी, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत हा प्रयोग झाला.

भविष्यातही वापर

लसीबरोबरच पुढील काळात औषधे, प्रत्यारोपणासाठी लागणारे अवयव, रक्त यांची अत्यावश्यकता भासल्यास वेळेत पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. जव्हार, मोखाडासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य व्यवस्था मोडकळीस आलेली पाहायला मिळते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे ड्रोन सुविधेमुळे आरोग्य विभागाला अनेकांचे जीव वाचवता येतील.

- डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com