दुष्काळाच्या सावटाखाली पालघर जिल्हा

भगवान खैरनार
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

मोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य नगदी पिके बर्‍याच अंशी पावसाअभावी करपुन गेली आहेत. तर वाचलेले पिक 50 टक्के ही हाती येणार नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे.

मोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य नगदी पिके बर्‍याच अंशी पावसाअभावी करपुन गेली आहेत. तर वाचलेले पिक 50 टक्के ही हाती येणार नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे.

जिल्ह्य़ात पालघर, वाडा, विक्रमगड, डहाणू, तलासरी, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यामध्ये भाताचे मुख्य पिक घेतले जाते. तसेच आदिवासी तालुक्यांमध्ये नागली आणि वरई चे नगदी पीक घेतले जाते. या पिकांबरोबरच ऊडीद, तुर, कुळीद, खुरासणी ही दुय्यम पिके घेतली जातात. या वर्षी श्रावण महिण्यापर्यंत शेतीस ऊपयुक्त असा पाऊस झाला आहे. मात्र, त्यानंतर पावसाने महिना-दिड महिना दडी मारल्याने भात, नागली आणि वरई सह दुय्यम पिके ही धोक्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील कडक ऊन्हामुळे जिल्हयातील तालुक्यांमध्ये बहुतांश पिक करपुन गेले, भात, नागली आणि वरई या पिकांवर करपा, तांब्या आणि बगळ्या रोगांचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती 50 टक्क्यांपेक्षाही कमी पिक लागणार आहे. अनेक भागात पिक करपल्याने पिकाऐवजी गवताची पेंढी हाती येण्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात नजर आणेवारी ने पिक पहाणी करण्यात आली आहे. त्यावेळी पावसामुळे पिकांची स्थिती बर्‍यापैकी होती. त्यामुळे सरकारी आकडेवारी नुसार सरकारी 70 टक्क्यांपर्यत आणेवारी दर्शविण्यात आली आहे. मात्र, पुढिल दिड महिना संपूर्ण कोरडा आणि कडक ऊन्हाचा गेल्याने मुख्य पिकांसह दुय्यम पिके ही धोक्यात आली आहेत. शासनाकडून तिन टप्प्यात पिकांची आणेवारी (पैसेवारी) काढली जाते. त्यामध्ये पहिली नजर आणेवारी झाली. त्यामध्ये पहिली नजर आणेवारी झाली आहे. त्यानंतरची सुधारित आणि अंतिम आणेवारी अध्यापपर्यत झालेली नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व च पालकमंत्र्यांना गावा-गावांत जाऊन पिकांची स्थिती पाहुन दुष्काळी स्थिती चे प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील पिकांची स्थिती पाहून, राज्यातील 32 जिल्ह्यातील 201 तालुके दुष्काळ सदृश्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तशी यादी सुस्थितीत सोशल मीडियावर फिरत आहे. या यादीमध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्ष पिक पहाणी तलाठ्यांनी करण्यापूर्विच शासनाने हा अंदाज बांधला आहे. प्रत्यक्षात मात्र, संपूर्ण पालघर जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसावर अवलंबून आहे. तर दिड महिना पाऊस न पडल्याने सर्व च तालुक्यातील पिकांची आणेवारी 50 टक्क्यांपेक्षाही खाली येणार असल्याचे वास्तव असल्याने संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. दरम्यान, शासनाच्या धोरणानूसार 50 टक्यांपेक्षा कमी आणेवारी आल्यानंतरच त्या भागात दुष्काळ जाहीर केला जातो. त्यामुळे शासनाकडून सुधारीत पाहणीचे दिले आहेत, मात्र, त्याची प्रत्यक्ष पाहणी ला अध्यापपर्यत कुठेही सुरूवात झालेली नाही.

शासनाच्या आदेशानुसार सुधारित पाहणी करण्याचे आदेश तलाठ्यांनी देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात केलेल्या नजर आणेवारी नुसार 70 टक्के पिकांची आणेवारी प्रत्यक्ष पाहणीत आढळून आली आहे. आता पुढील दोन पाहणीतंतर, पिकांच्या स्थिती ची टक्केवारी समोर येईल.

- पी. जी. कोरडे, निवासी नायब तहसीलदार, मोखाडा.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palghar district under drought situation