पालघरमध्ये खातेदारांच्या पैशांसाठी रांगा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पालघर ः रिझर्व बॅंकेने पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बॅंकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बॅंकेने तसे संदेश ग्राहकांना आणि ठेवीदारांना पाठवल्यानंतर मंगळवारी (ता.२४) पालघर येथील बॅंकेच्या शाखेबाहेर ग्राहकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत; मात्र ग्राहकांच्या हातात काहीच न पडल्यामुळे ते हताश झाले आहेत.

बॅंकेच्या ग्राहकांना महिन्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार आहेत. आरबीआयने निर्बंध लादल्याने आर्थिक देवाण-घेवाण करताना मर्यादा येणार आहेत. नवी कर्जे देणे, नव्या ठेवी स्वीकारणे यावर निर्बंध आहेत. बॅंकेने आज सकाळपासूनच याबाबतचे संदेश खातेदारांना पाठवल्यामुळे बॅंकेसमोर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

बॅंकेत माहिती देण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने ग्राहकांना काहीच माहिती मिळत नव्हती. असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातले असल्याचे सांगितले जात होते. काहींची आयुष्याची जमापुंजी बॅंकेत अडकल्याने ते रडकुंडीला आले होते. आज मात्र ग्राहकांना काहीच रक्कम न मिळाल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Palghar lined up for accountant's money in front of pmc bankपालघर, ता. २४ (बातमीदार) ः रिझर्व बॅंकेने पंजाब ॲण्ड महाराष्ट्र बॅंकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. बॅंकेने तसे संदेश ग्राहकांना आणि ठेवीदारांना पाठवल्यानंतर मंगळवारी (ता.२४) पालघ