पालघर लोकसभा पोटनिवडणूक ; 19 जणांनी घेतले 38 उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

आचारसंहितेच्या पालनाचे आदेश 
निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.  

विक्रमगड : बहुजन विकास आघाडी, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप व किसान सभा यांच्याकडून पाच उमेदवार पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतील, असे चित्र सध्या तरी आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूक पुढील निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपला शह देण्यासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावतील. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. ही पोटनिवडणूक 28 मे रोजी होणार आहे. 10 मे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. 

आजअखेरपर्यंत 19 जणांनी 38 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणते उमेदवार नामनिर्देशनपत्र भरणार याची उत्सुकता आहे. भाजपसाठी ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे. दिवंगत खासदार वनगा यांचे कुटुंबीय सेनेच्या वाटेवर गेल्याने त्याचा फटका बसणार का, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. तीच परिस्थिती कॉंग्रेसची आहे.

बहुजन विकास आघाडीचीही या निवडणूक निकालातील मताधिक्‍य राजकीय भविष्य निश्‍चित करणार आहे. किसान सभेलाही राजकीय पत टिकवण्यासाठी या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरावे लागणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल, असे चित्र राजकीय वर्तुळात आहे. 

आचारसंहितेच्या पालनाचे आदेश 
निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.  

 
 

Web Title: Palghar Lok Sabha by election 19 candidates took 38 nomination papers