मुंबई - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पंचरंगी, तर भंडारा-गोंदियामध्ये दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
चिंतामण वनगा यांच्या अकाली निधनाने पालघर, तर नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावित, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दामू शिंगाडा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर भंडारा गोंदियात भाजपचे हेमंत पटले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे यांची उमेदवारी कायम आहे. मतदान येत्या 28 मे रोजी होणार आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार देवराज बावनकर यांना अखेरपर्यंत "एबी फॉर्म8' मिळाला नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र आहे.
|